दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२८ मार्च २०२२ । सातारा । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील शालांत परीक्षोत्तर (मेट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या   दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी  डीबीटी प्रणालीद्वारे   शिष्यवृत्तीच्या रकमा विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.  या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना http://mahadbtmahait.gov.in  या संकेत स्थळावर सन 2021-22 मधील व  नूतनीकरण ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, डॉ. सपना घोळवे यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयांनी मेट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज वरील संकेतस्थळावर ऑनलाइन भरण्याबाबतची  कार्यवाही दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत करावी असे आवाहनही    डॉ. सपना घोळवे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!