
दैनिक स्थैर्य । 23 मार्च 2025। मुंबई । राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत वाहनमालकांना मुदत देण्यात आली होती.
आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याचे काम कमी झाले असल्याने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता 3 संस्थाची /उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड केली आहे. तरी संबंधित वाहन मालकांनी याची नोंद घेऊन 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्यात यावी, असे आवाहन परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.