रांजणी गावात मृत अर्भक आढळले, महिलेवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२० जानेवारी २०२२ । माण ।  माण तालुक्यातील रांजणी गावच्या हद्दीत एका शेतात एक मृत अर्भक आढळून आले. याप्रकरणी पोलिस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गावातीलच एक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, गावातील आप्पा दगडु ढवळे यांचे शेतातील ज्वारीचे पिकात एक नवजात पुरूष जातिचे मृत अवस्थेत असलेले अर्भक कुत्र्याने ओढुन आणुन शेतात टाकले असल्याची माहिती पोलिस पाटील यांना मिळाली. याबाबत त्यांनी चौकशी केली असता शेताजवळ असलेल्या घरामध्ये एक महिलेने नवजात अर्भक तिला जन्मते वेळीच मृत अवस्थेत जन्माला आल्याने ज्वारीचे पिकात पाच दिवसापुर्वी टाकलेचे सांगितले. मृत अर्भकाची कोणास काही एक माहीती न देता गुप्तपणे विल्हेवाट लावल्याची व अर्भक जन्मल्याची महिती लपवून ठेवल्याचे लक्षात आल्याने पोलिस पाटील यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!