दाउदच्या जवळचा गँगस्टर इकबाल मिर्चीची 22 कोटी रुपयांची संपत्ती जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.२१: अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहयोगी इक्बाल मिर्चीच्या कुटुंबातील 7 जणांची मालमत्ता जप्त केली. यामध्ये एक सिनेमा हॉल, एक हॉटेल, निर्माणाधीन हॉटेल, दोन बंगले आणि पंचगणीतील 3.5 एकर जागेचा समावेश आहे. जप्त केलेल्या संपत्तीची किंमत 22 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. ईडीने मिर्चीशी संबंधित ही संपत्ती मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा 2002 (पीएमएलए) च्या कलम 5 अंतर्गत जप्त केली आहे.

गेल्या महिन्यात 200 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती

अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या महिन्यात इक्बाल मिर्चीवर कारवाई करण्यासाठी त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाची मालमत्ता देखील जप्त केली होती. सप्टेंबरमध्ये, ईडीने मिर्चीच्या कुटुंबातील सदस्यांची सुमारे 15 मालमत्ता जप्त केली, ज्यात संयुक्त अरब अमिराती (दुबई) मधील मालमत्ता देखील आहेत. त्याची किंमत अंदाजे 200 कोटी इतकी आहे.

मिर्ची एक हजार कोटींचा मालक

इक्बाल मिर्चीची लंडन, दुबई आणि मुंबई येथे एक हजार कोटी रुपयांच्या 30 मालमत्ता तपास यंत्रणांनी शोधून काढल्या आहेत. त्याची सर्वाधिक मालमत्ता दुबईत आहे. ईडीने इक्बाल मिर्ची, त्याचे कुटुंब आणि इतर लोकांविरुद्ध 26 सप्टेंबर 2019 रोजी मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मुंबईचे बांधकाम व्यावसायिक कपिल वाधवन, धीरज वाधवन, हुमायूं मर्चंट यांच्यासह एकूण 5 जणांना अटकही करण्यात आली आहे.

इक्बाल मिर्चीवर ड्रग्स तस्करीसह अनेक आरोप आहेत

मिर्ची माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार होता, त्याच्यावर मादक पदार्थांची तस्करी आणि खंडणीतून पैसे उकळण्याचे आरोप होते. अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वी सांगितले होते की इक्बाल मिर्ची आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्कर होता ज्याने जगभरात अचल जंगम व स्थावर मालमत्ता मिळविली आहे. मिर्चीने अप्रत्यक्षपणे मुंबई व आसपासच्या भागातही अनेक मालमत्ता घेतल्याचा आरोप एजन्सीने केला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!