दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुका पोलीस पाटील संघाचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार माननीय अरविंद मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सातारा जिल्हाध्यक्ष प्रदीप गाढवे, सातारा जिल्हा सल्लागार सोमनाथ जगताप, मावळते अध्यक्ष अजित बोबडे, माजी अध्यक्ष शांताराम काळेल यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरगावचे पोलीस पाटील दत्तात्रय सरक यांची तालुका अध्यक्षपदी तथा बिबी गावचे पोलीस पाटील अजित बोबडे यांची कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचे महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, फलटण उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, तहसिलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी फलटण तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.