
स्थैर्य, फलटण : फलटण पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांचे वडील कांतीलाल गुंजवटे यांचे वयाच्या ७२ वर्षी यांचे निधन झाले. कांतीलाल गुंजवटे यांच्या पच्छात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
कांतीलाल गुंजवटे यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर यांच्यासह फलटण तालुक्यातील विविध मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.