दत्तात्रय गावडे यांचे निधन


दैनिक स्थैर्य । दि. ३१ जानेवारी २०२२ । गोखळी । फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व फलटण तालुका दुध संघाचे माजी चेअरमन दत्तात्रय गणपत गावडे (अण्णा) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पच्छात पत्नी, दोन विवाहित मुले, तीन विवाहित मुली, एक विवाहित भाऊ, एक विवाहित बहिण असा परीवार आहे.

घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेत विविध सामाजिक शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गोखळी येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सचिन सुर्यवंशी- बेडके, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांनी गावडे कुटुंबियांचे सांत्वन केले.


Back to top button
Don`t copy text!