
दैनिक स्थैर्य । 28 मार्च 2025। सोनवडी । सोनवडी खुर्दच्या (ता. फलटण) उपसरपंचपदी राजे गटाचे दत्तात्रय चव्हाण यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी सरपंचांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सैनिक शरद सोनवलकर यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार नवनिर्वाचीत उपसरपंच दत्तात्रय चव्हाण यांच्या हस्ते तसेच बँक व्यवस्थापक पदी बापूसाहेब बबन सोनवलकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार संचालकांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे महादेव सोनवलकर यांनी सूत्रसंचालन केले.
बापूसाहेब सोनवलकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, उपसंचालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.