
दैनिक स्थैर्य | दि. २० डिसेंबर २०२४ | फलटण |
‘रक्तदान’ ही भक्तीची व भगवंताची सेवा आहे. यातून अनेक कुटुंबांना जीवदान मिळणार आहे. रक्तदानातून श्रीदत्त जयंती साजरी करणे, हा कौतुकास्पद उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रबोधनकार प्रा. रविंद्र कोकरे यांनी केले.
सांगवी (तालुका फलटण) येथील श्रीदत्त सेवेकरी मंडळाच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक सेवा म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. कोकरे बोलत होते.
रक्तदानाबरोबरच प्रवचन, संगीत भजन, दत्तयाग होमहवन, अभिषेक, महाप्रसादाचे नियोजन केले होते. मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूर यांच्या सहकार्याने शिबीर आयोजित केले होते. शिबिरात ६१ जणांनी रक्तदान केले. यावेळी आबा हेगडकर, पोपटराव गायकवाड (गुरुजी), मधुकर वाबळे, केतूभाई पटेल, हजरतभाई शेख, प्रमोद कुंभार, चांगदेव खरात आदी उपस्थित होते.