गेंडामाळ येथे दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


सातारा – दत्त मंदिरातील श्री दत्त मूर्ती. (छायाचित्र – अतुल देशपांडे)

स्थैर्य, सातारा, दि. 28 नोव्हेंबर : येथील गेंडामाळ शाहूपुरी परिसरातील श्री गेंडामाळ दत्त मंदिर येथे दत्त जयंती निमित्त दोन दिवशीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये बुधवार 3 डिसेंबर रोजी सकाळी श्री दत्तयाग संपन्न होणार आहे , तसेच दुपारी तीन ते चार या वेळेत मार्तंड महिला भजनी मंडळ ,शाहुपुरी याची भजन सेवा तसेच सायंकाळी पाच ते सहा या वेळेतओंकार भजनी मंडळ, शाहुपुरी यांची भजन सेवा होणार आहे.

दत्त जयंती दिवशी गुरुवार दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 10.30 या वेळेत श्रींची षौडशोपचार पुजा, अभिषेक, नैवेद्य, आरती,दुपारी तीन ते चार या वेळेत स्तोत्र पठण, रामकृष्ण मंडळ शाहुपुरी, सातारा यांच्या भगिनी वर्ग करणार असून सायंकाळी 5 वाजता जन्मकाळ किर्तन व जन्मकाळ सौ. मंजुषा बाजी, शाहुपुरी सातारा या सादर करणार आहेत.या सर्व कार्यक्रमांना सातारकर दत्तभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास कासट यांनी आवाहन केले आहे.

 


Back to top button
Don`t copy text!