डॅशिंग विश्वजितराजेनांच पंचायत समितीचे सभापती करा; शहर राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲड. संदीप लोंढे यांची मागणी


दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२१ | फलटण | सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांनी फलटण पंचायत समिती सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर डॅशिंग व्यक्तिमत्व असलेले श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांना सभापती करावे, अशी मागणी फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते ॲड. संदीप लोंढे यांनी केलेली आहे.

श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे असणारा युवकांचा संच पाहता ते पुढील निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका नक्कीच बजावतील असे सध्या दिसुन येत आहे. विकासाची नवी दृष्टी घेऊन व युवकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर हेच उत्तम पर्याय असू शकतात, असेही ॲड. संदीप लोंढे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!