दासनवमी उत्सवाला प्रारंभ….


सज्जनगड – येथे राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या दासनवमी उत्सवाला सोमवार (दि. 2) फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. हा उत्सव 11 फेब्रुवारी पर्यंत बहरत जाणार आहे. उत्सवानिमित्त समर्थ रामदास यांच्या समाधी तसेच पंचधातूच्या श्रीराम मूर्तीला विशेष पूजा आणि सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण देशातील नामांकित कीर्तनकार गायक, वादक हे या महोत्सवात रंग भरणार आहेत. सज्जनगड तीर्थक्षेत्री यानिमित्त केलेली विद्युत रोषणाई तसेच शेकडोंच्या समर्थ भक्तांनी नित्य स्तोत्रे पठण करीत या उत्सवाची रंगत वाढवली आहे या कार्यक्रमात पहिल्या दिवशी कीर्तनकार शामबुवा घुमकेकर, नागपूर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले तर चेन्नई येथील लालगुडी कृष्णन यांच्या व्हायोलीन वादनाने रंगत वाढविली. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)


Back to top button
Don`t copy text!