दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
नारी तू नारायणी, नारी तू सबला!
तुझ्या तेजाने उजळी सारी सृष्टी,
नमीतो आम्ही तुजला!
या उक्तीप्रमाणे सध्या नवरात्रौत्सवच्या निमित्ताने सगळीकडे धामधूम सुरू आहे. गरबा नृत्य, दांडिया नृत्य, देवीच्या नवरात्री जागवण्यासाठी विविध प्रकारचे स्त्रियांचे खेळ सुरू आहेत. नऊ दिवसांच्या नऊ रंगामध्ये अनेक महिला वर्गाने वेगवेगळी रूपे दाखविली आहेत. असाच नवरात्रीसाठी एक आगळावेगळा प्रयत्न फलटणच्या संत नामदेव महाराज महिला मंडळाने केला आहे.
आईचे स्वरूप, शेतकरी रूप, छत्रपती जिजाऊ माता, क्रांतीजोती सावित्रीमाता फुले, देशाचे सैनिक रूप, रक्षणकर्ते पोलिस रूप, कायद्याचे रक्षणकर्ते वकील रूप, आरोग्याचे स्वरूप डॉक्टर आणि भारतमातेचे रूप या महिला मंडळाने साकारून आधुनिक काळातील सामाजिक रक्षणकर्त्यांची ओळख नव्याने करून दिली आहे.
या कार्यक्रमात महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पद्मा टाळकुटे, धनश्री पोरे, अंजली कुमठेकर, प्रिया टाळकुटे, मंजुषा टाळकुटे, रूपाली टाळकुटे, अॅड. अश्विनी मोहोटकर, कल्पना टाळकुटे, प्रियांका पोरे यांनी सहभाग घेतला.