
दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम महात्मा एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री. रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते व सर्व पत्रकार तथा संस्था पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सोमवार, दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी दु.१२ वाजता आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय फलटण, गजानन चौक, खजिना हौदा शेजारी आयोजित केलेला आहे. यावेळी सर्व संस्था सदस्य व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भिवा जगताप यांनी केले आहे.