
स्थैर्य, सातारा, दि.५: पालिका हद्दीत समावेश न केलेल्या दरे बुद्रुकची ग्रामपंचायत निवडणूक पुन्हा घ्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हाधिकारी शेखर सिंह . यांना निवेदन देऊन दि.26 जानेवारीला उपोषणचा इशारा दिला. यावेळी रवींद्र पाटेकर, सुनील शिंदे, विनायक मोरे, प्रकाश मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर त्यामध्ये समावेश झालेली दरे बुद्रुक ग्रामपंचायत बरखास्त झाली. मात्र, केवळ दरे खुर्द हे गाव शहरात घेण्यात आले, दरे बुद्रुक हे त्रिशंकू केले गेले. तीन महिन्यांपासून या भागात लाईट नाही, पाणी नाही. ग्रामपंचायत दप्तर पालिकेने नेले आहे. ग्रामपंचायत मुदत संपली असल्याने निवडणूक घ्यावी व सर्व अधिकार पुन्हा द्यावेत, अन्यथा दि.26 रोजी उपोषण करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.