दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२३ । दापोली । कै वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त, आणि कृषी दिनाचे अवचित्य साधून विस्तार शिक्षण संचालनालय मार्फत आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये एन. सी. सी छात्र सेना कृषी महाविद्यालय दापोली, यांनी वृक्षारोपणाच कार्यक्रमामधे सहभाग घेतला. कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू मा.डॉ.संजय भावे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा विस्तार शिक्षण संचालक मा.डॉ.प्रमोद सावंत सर उपस्थित होते. सहयोगी राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी लेफ्ट.डॉ. हेमंत बोराटे उपस्थित होते. या कार्यक्रमाअंतर्गत सर्व एन.सी.सी छात्र सैनिकांनी गट क्रमांक २० (एकता पार्क प्रक्षेत्र) येथे वृक्षारोपण पार पाडले.
या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये बकुळ, उती संवर्धित बांबू, रॉयल पाल्म या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कृषि दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी आणि एन.सी.सी छात्र सैनिकांचे मा.डॉ.प्रमोद सावंत सर यांनी आभार मानले !!