चारा आणायला शेतात गेलेल्या दलित मुलींनी गमावला जीव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, उन्नाव,दि.१८: उत्तर प्रदेशातील महिला आणि दलितांवरील अत्याचाराच्या घटना घडण्याचे थांबताना दिसत नसून एका नव्या ताज्या घटनेत, शेतात चारा आणायला गेलेल्या तीन दलित मुलींपैकी दोघी जणी मृतावस्थेत सापडल्याने खळबल उडाली आहे. ही घटनाही उन्नावमध्ये घडली आहे. बुधवारी चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तिन्ही मुली एका शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडल्या होत्या. यामधील दोघींचा मृत्यू झालेला असून एका मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलींवर विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान पोलिसांनी गावकरी आणि पीडित मुलींच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु केली आहे. परिसरात शेती असल्याने कुठेही सीसीटीव्ही लावण्यात आलेला नाही. दुसरीकडे दलित संघटना आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी रुग्णालयात दाखल मुलीला चांगले उपचार मिळावेत यासाठी एम्समध्ये दाखल करावं अशी मागणी केली आहे.

उन्नावचे पोलीस अधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुलींचा रुग्णालयात मृत्यू झाला असून एकीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्‍टरांनी विषप्रयोग झाल्याची लक्षणं दिसत असल्याचं सांगितलं आहे.

तपासासाठी पोलिसांची सहा पथकं तयार करण्यात आली असून प्राथमिकदृष्ट्या मुलींवर विषप्रयोग करण्यात आल्याचं दिसत असून घटनास्थळी काही पुरावेदेखील सापडले असल्याचं, आनंद कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.


Back to top button
Don`t copy text!