तरुण पिढी चांगली घडविण्यासाठी दैनंदिन उपासना आवश्यक

कल्याणी नामजोशी; कार्तिक एकादशीनिमित्त गिरवीतील श्रीकृष्ण मंदिरात भगवत्गीता व विष्णूसहस्त्रनामाचे पठण


गिरवी, ता. फलटण – गोपालकृष्ण मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त कार्यक्रमात बोलताना कल्याणी नामजोशी

स्थैर्य, फलटण, दि. 9 नोव्हेंबर : कोणतीही उपासना, पारायण मनापासून करावी. कोणताही ग्रंथ वाचताना तो जेव्हा मुखातून जातो, तो ग्रहण करताना शरीर, मन, बुध्दी, अहंकार यावर मात करुन आपण सात्विक बनतो. सध्याच्या काळात तरुणपिढी चांगली घडविण्यासाठी दैनंदिन उपासनग करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. असे पुणे येथील कल्याणी नामजोशी यांनी गिरवी येथे प्रवचनात मार्गदर्शन करताना सांगितले.

गिरवी, ता. फलटण येथील गोपालकृष्ण मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीमद् भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचे पठण तसेच विष्णू सहस्त्रनामाचे पठण तुलसी अर्चन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कल्याणी नामजोशी म्हणाल्या, प्रत्येक साधकाने गीतापठण अथवा इतर ग्रंथांचे पठण केल्यास प्रत्येक मंत्राची शक्ती देह, श्वास, मेंदूपर्यंत जाते. तरुणपिढी चांगली घडविण्यासाठी आज उपासना व पारायण करण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले. ‘कार्तिकी एकादशी’ या मंगल दिनी भगवान श्रीगोपाळकृष्णाची ममहापूजा’ अत्यंत भक्तिभावाने करण्यात आली. ज्यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय आणि चैतन्यमय झाले आहे. ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. गिरवी हे भगवान श्रीकृष्णांचे एक महत्त्वाचे वसतीस्थान आहे. याठिकाणी दर्शन, उपासना, सेवा करणार्‍या भाविकांना उत्तम अनुभव व प्रचिती येते. याठिकाणी करण्यात येणार्‍या भक्तीमार्ग प्रचार व प्रसार कार्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी नागपूर, संभाजीनगर, परभणी, सोलापूर, मुंबई, नाशिक येेथील साधक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजेनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिराचे विश्वस्त जयंतराव देशपांडे व सौ. सुनिता देशपांडे यांनी सुत्रसंचालन केले.


Back to top button
Don`t copy text!