
दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
फलटण येथे गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी २०२५ ते शनिवार, दि. २९ मार्च २०२५ या धर्मवीर बलिदान मासनिमित्त छत्रपती श्री संभाजी महाराज यांना ३० दिवस श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
फलटण म्हणजे शंभूराजांचे आजोळ. त्यामुळे या नावाला शोभेल असा बलिदान मास पाळण्याचे सर्व फलटणकरांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभाग यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.
सर्वांनी घरात बलिदान मास पाळून धर्मवीर शंभूराजांना श्रद्धांजली अर्पण करावी.
धर्मवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम श्री माळजाई मंदिर समोर, श्री शंभूतीर्थ, फलटण येथे दररोज सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
माहितीसाठी ९०९६६०८०६१, ९५०३६५७९३३, ९९६०९३८४८४ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण विभाग यांनी केले आहे.