बारामती येथे युथ फेस्टिव्हलचा दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ ऑगस्ट २०२२ । बारामती । बारामती येथे युथ फेस्टिवल चा दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दि.२०/८/२०२२ रोजी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सव या उत्सवाचे आयोजन पोपट भाऊ दराडे मित्रपरिवार बारामती यांच्या माध्यमातून करण्यात आले. या दहीहंडी महोत्सवाचे उद्घाटक राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आ.धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यभरात दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचप्रमाणे पोपट भाऊ दराडे मित्रपरिवार यांच्या माध्यमातून बारामती येथील नागरिकांना दहीहंडी महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले होते. या दहीहंडी महोत्सवासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. परळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माणिक भाऊ फड यांच्या सह धनंजय मुंडे साहेब युवा प्रतिष्ठान सोलापूर चे सनी देवकते व धारूर येथील युवा नेते प्रदीप नेहरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते. तसेच प्रमुख पाहुण्यांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. शहरातील विद्यानगर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी महोत्सव पाहण्यासाठी जनसागर उसळला होता. दहीहंडी विजेत्या संघाला वंजारवाडी युथ फेस्टिवल च्या वतीने आयोजक पोपट भाऊ दराडे व सागर भाऊ दराडे , नितीन भाऊ चौधर यांनी आ. धनंजय भाऊ मुंडे चषक देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान चौकामधील दहीहंडी पथकांचा थरार पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची व पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दहीहंडी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी वंजारवाडी युथ फेस्टिवल चे संस्थापक अध्यक्ष पोपट भाऊ दराडे, अध्यक्ष राहुल शिरसट , उपाध्यक्ष सचिन चौधर, खजिनदार समीर चौधर , कार्याध्यक्ष विशाल चौधर तसेच , संयोजन समिती सदस्य आकाश सूर्यवंशी, अजित भोसले, रोहित साळुंके, विजय चौधर, शुभम दराडे, प्रवीण चौधर, तारा देवासी आदींनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!