फलटणच्या अप्पर तहसीलदारपदी दादासाहेब दराडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण येथे परीक्षावधीन उपजिल्हाधिकारी दादासाहेब दराडे यांची अप्पर तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबतचे आदेश सातारचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी पारित केलेले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की दादासाहेब सुखदेव दराडे यांना परीक्षावधीन कालावधीसाठी सातारा जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये दराडे यांना एका तालुक्याच्या अप्पर तहसीलदार पदी नियुक्ती करणे आवश्यक असते. त्यानुसार दादासाहेब दराडे यांची फलटण तालुक्याच्या अप्पर तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

दादासाहेब सुखदेव दराडे यांची फलटण तालुक्याच्या अप्पर तहसीलदार पदी निवड झाल्यानंतर त्यांना मंडळ म्हणून गिरवी, राजाळे, बरड व आसु ही मंडळी त्यांच्या अखत्यारीत असणार आहेत. असाही उल्लेख नियुक्ती आदेशात करण्यात आलेला आहे.


Back to top button
Don`t copy text!