
स्थैर्य, फलटण, दि. २३ नोव्हेंबर : प्रभाग क्रमांक ११ मध्ये तिरंगी लढतीचं वातावरण असलं तरी, शिवसेनेचे उमेदवार कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांनी प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना ते केवळ आश्वासनांवर न थांबता मागील काळातील ‘राजे गट’च्या विकासकामांचा तपशील मांडत आहेत.
दादासाहेब चोरमले मतदारांना सांगतात की, फलटणमध्ये आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा प्रवाह सातत्याने सुरू राहिला आहे. हे सातत्य टिकावं आणि येणारे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी मतदारांनी ठाम निर्णय घ्यावा, असे ते आवाहन करत आहेत.
प्रभागातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याबाबत ते विशेष लक्ष देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. स्थानिक समस्या, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता अशा प्रश्नांची त्यांनी थेट दखल घेऊन उपाययोजना करण्याची तयारी दाखवली आहे.
एकंदरीत, अनुभव, कामाचा ठसा आणि नागरिकांशी असलेली जवळीक याच्या जोरावर दादासाहेब चोरमले यांनी प्रभाग ११ मध्ये स्वतःची मजबूत पकड निर्माण केली आहे. आता मतदार ‘विकासाला गती’ देणाऱ्या उमेदवाराला किती साथ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
