सातारा नगर वाचनालयाच्यावतीने शुक्रवारपासून दादा वाडीकर स्मृती व्याख्यानमाला


स्थैर्य, सातारा, दि. 1 ऑक्टोबर : येथील छत्रपती प्रतापसिंग महाराज थोरले नगर वाचनालयातर्फे ल. ना. तथा दादा वाडीकर स्मृती प्रित्यर्थ शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून त्याचा प्रारंभ शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पाच दिवस चाललेली चालणारी ही व्याख्यानमाला पाठक हॉलमध्ये होणार असून दररोज संध्याकाळी 6 वाजता व्याख्यान होणार आहे
शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी संजय कुलकर्णी पुणे यांचे कुटुंब व्यवस्था काल आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक अशोक इंदलकर यांचे ‘एन्काऊंटर सत्य आणि वास्तव’ या विषयावर व्याख्यान होणार आहे रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील कवी व लेखक आदित्य दवणे यांचे ‘तुझे माझे नाते सांग’ हा कार्यक्रम होणार आहे सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी कर्नल केदार भिडे यांचे ‘युध्दस्य कथा रम्या’ या विषयावर व्याख्यान होणार आहे मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील निवृत्त बँक अधिकारी सतीश कुलकर्णी यांचे साहीर हर पल का शायर विषयावर व्याख्यान होणार आहे सर्वानी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी उपाध्यक्ष सीए अतुल जोशी आणि विश्वस्त समितीचे अध्यक्ष अनंतराव जोशी यांनी केले आहे


Back to top button
Don`t copy text!