सातार्‍यात 9 फेब्रुवारीपासून दादा महाराज चषक टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन


स्थैर्य, 2 फेब्रुवारी, सातारा : स्व. श्री. छ. प्रतापसिंहमहाराज उर्फ दादा महाराज चषक टेनिस बॉल स्पर्धा सोमवार दिनांक 09 फेब्रुवारी 2026 पासून सातारा श्री. छ. शाहू स्टेडियम येथे सुरु होत आहे. स्पर्धेचा समारोप सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजीच्या अंतिम सामन्यानंतर होणार आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी राज्यातील क्रिकेट संघानी दि. 07 फेब्रुवारीअखेरपर्यंत सातारा येथील विराज स्पोर्टस, 9420272112, विघ्नहर्ता स्पोर्टस, 9881575384, ज्योती स्पोर्टस छ शाहू स्टेडियम, सातारा यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धेचे मुख्य आयोजक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाच्यावतीने दिली आहे.

दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धा केवळ महानगरामध्ये आयोजित होत असताना, सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन, क्रीडाप्रेमी मान्यवर, क्रिकेटपटू यांच्या सहकार्यामुळे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाच्यावतीने सुमारे 22 वर्षापूर्वी स्व. प्रतापसिंहमहाराज उर्फ दादामहाराज दिवस-रात्र टेनिस चेंडू क्रिकेट स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यंदाचे वर्षी या स्पर्धेचे 23 वे वर्ष असून ग्रामीण भागातील नवोदिन खेळाडूंसाठी ही स्पर्धा म्हणजे पर्वणी असते.

यंदाच्या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकाना रोख बक्षिसे व चषक प्रदान करण्यात येणार आहे. प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे रुपये 3 लाख, 2 लाख व 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तृतीय क्रमांकाचे बक्षिस जिंकणार्‍या आणि हरणार्‍या संघात विभागून देण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन उदयनराजे भोसले मित्रसमुहातर्फे करण्यात आले असून, सातारा क्रिकेट असोसिएशन तर्फे तज्ञ पंच व आंतराष्ट्रीय नियमानुसार स्पर्धाचे आयोजन होणार आहे. क्रीकेट स्पर्धेसाठी उच्य क्षमतेचे हायमास्ट प्रकाशझोताचे आवश्यक दिवे लावण्यात येणार आहेत. तसेच खेळपटटी टेनिस क्रीकेटच्या नियमानुसार बनविणेत येत आहे. स्पर्धेच्या क्रीडांगणावरील (पीच वरील) प्रत्येक निर्णयाचे पुर्नविलोकन होण्यासाठी थर्ड अंपायची विशेष व्यवस्था असणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम दिवशी म्हणजेच दिनांक 23/02/2026 रोजी सेमी फायनल आणि फायनलच्या मॅचेस होणार असून, फायनल मॅच नंतर लगेचच बक्षिस समारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेला क्रीडा समीक्षक व स्पर्धेचे मार्गदर्शक सुरेश साधले, जि.प. माजी सभापती श्री सुनिल तात्या काटकर, उपनगराध्यक्ष डी.जी. बनकर, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी सेक्रेटरी सुधाकर शानबाग, जितेंद्र खानविलकर, सोमनाथ (काका) धुमाळ, रक्षक प्रतिष्ठान संस्थापक सुशिल दादा मोझर, नगरसेवक मनोज शेंडे, नगरसेवक पंकज चव्हाण, संग्राम बर्गे, श्री किशोर (तात्या) शिंदे, श्री इशीद बागवान, वसंत (आण्णा) लेवे, विजय बडेकर, वसंतशेठ जोशी, सागर पावशे, मयूर कांबळे, मनोज कान्हेरे, सुजित जाधव, प्रणव लेवे, मनीष घोरपडे, धनंजय बापु पाटील, योगेश पाटील, अजय गायकवाड, प्रविण भोसले, सुनिल भोसले (सनी), सचिन खोले, अमित बडेकर, किरण राजेभोसले, राहुल गायकवाड, रवी माने व स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी घेतलेले अमोल पाटुकले यांचेसह उदयनराजे भोसले मित्र समुहाचे सर्व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत. सातारकर किकेटप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समुहाने केले आहे.


Back to top button
Don`t copy text!