बारामती येथे ‘फिट इंडिया’ अंतर्गत सायक्लोथॉन उत्साहात


बारामती – सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वितरणप्रसंगी विविध पोलीस अधिकारी.

स्थैर्य, बारामती, दि. 25 ऑगस्ट : पुणे जिल्ह्यातील उच्चपदस्थ पोलीस अधिकारी यांच्यासमवेत बारामती सायकलक्लबचे सदस्य आणि पोलीस कर्मचारी अशा 300 सायकल स्वारांनी या सायक्लोथॉनमध्ये भाग घेतला.

रविवार (दि. 24) रोजी फिट इंडिया मिशन अंतर्गत संडे सायकल ऑन आणि फिट इंडिया अंतर्गत पुणे ग्रामीण पोलीस , बारामती नगरपरिषद बारामती आणि बारामती सायकल क्लब यांच्या समवेत पहाटे 6 वाजता शारदा प्रांगण, भिगवण चौक, बारामती येथून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम पुण्यातून आलेल्या प्रेरणा जैन यांनी मेडिटेशन, हिलिंग आणि योगा याद्वारे सर्व उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.

पोलीस अधिक्षक (पुणे ग्रामीण) संदीपसिंग गिल यांच्यासमवेत गणेश बिडकर (अतिरिक्त जिल्हा अधीक्षक बारामती), सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती), विलास नाळे, (पोलीस निरीक्षक बारामती शहर), श्रीमती वैशाली पाटील (पोलीस निरीक्षक, बारामती तालुका) यांच्या समवेत बारामती सायकल क्लबचे सदस्य आणि पोलीस कर्मचारी अशा 300 सायकल स्वारांनी या 10 किलोमीटर सायक्लोथॉनमध्ये भाग घेतला.

ही सायकल रॅली शारदा प्रांगण- भिगवण चौक – इंदापूर चौक – गुणवडी चौक – गांधी चौक- पुन्हा भिगवण चौक – भिगवण रोड मार्गे – एमआयडीसी – पेन्सिल चौक – विद्या प्रतिष्ठान – रुईपाटी जवळून पुन्हा भिगवण रोड मार्गे- शारदा प्रांगण ,भिगवण चौक , बारामती येथे समाप्ती.. असा 10 किलोमीटरचा मार्ग होता. रॅलीच्या समाप्तीनंतर सायकल रॅलीमध्ये सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!