स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सायकल रॅली संपन्न; फलटण प्रशासनाच्या मार्फत करण्यात आले होते आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । फलटण । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फलटण तालुक्यामध्ये प्रांत कार्यालय व तहसीलदार कार्यालय यांच्या तर्फे फलटण सायकल असोसिएशन ची भव्य सायकल रॅली काढण्यात आली.

सकाळी साडेसात वाजता प्रांत कार्यालय फलटण येथून उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पंधरा किलोमिटर असलेल्या या सायकल रॅलीला सुरवात झाली.

ही रॅली प्रांत कार्यालय, गिरवी नाका, शहर पोलिस स्टेशन, मुधोजी कॉलेज, सातारा रोड वरून वाठार निंबाळकर येथे पोहचली. यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. तेथून पुन्हा सातारा रस्ता, ग्रामिण पोलिस स्टेशन, बारस्कार नाका, मारवाड पेठ, महात्मा फुले चौक मार्गे पुन्हा प्रांत कार्यालयात रॅली पोहचली.

यामध्ये फलटण सायकल असोसिएशनचे १५० सदस्य यामध्ये सहभागी  झाले होते. विषेश म्हणजे लहान मुले व महिलांचा सहभाग उल्लेखनिय होता. वाटेमध्ये हॉटेल साईरत्न व फलटण लायन्स क्लब यांच्यावतीने सायकलस्वारांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. या सायकल राईड मध्ये उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव यांनी संपूर्ण राईड सायकल चालवत पूर्ण केली. सायकल राईड पूर्ण केलेल्या सर्व सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

यावेळी फलटण प्रशासनाने पोलीस व्हॅन, टो व्हॅन, अँब्यूलंस ईत्यादी सोई पुरवल्या होत्या.


Back to top button
Don`t copy text!