बारामती मध्ये सायकल रॅली संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । बारामती । स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवार १४ ऑगस्ट रोजी, बारामती सायकल क्लब आणि एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने 75 किमी सायकलिंग चॅलेंज 536 सायकलस्वारांच्या सहभागाने यशस्वी झाली. सायकलिंग चॅलेंज ला अधिराज फलटण रोड येथून पहाटे ठीक सहा वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व विशेष दिव्यांग सायकलिस्ट यश नवगिरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. सदर राइड बारामती, मेडद, जळगाव, लोणीभापकर पाटी – मोरगाव व परत बारामती असे एकूण 75 किलोमीटर चे अंतर साठी हि रॅली काढण्यात आली.

रॅली समाप्तीनंतर प्रत्येक सायकलस्वारास एक आकर्षक मेडल, प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. बारामती सह श्रीपूर सायकल क्लब, फलटण सायकलिंग अससोशिएशन, भिगवण सायकल क्लब, लोणंद सायकल क्लब व इतर अन्य संस्थांच्या सदस्यांनी सहभाग घेतला. सदर सायकलिंग चॅलेंज च्या यापूर्वी 5 आवृत्ती झालेल्या होत्या तर आज 6 वी आवृत्ती होती.यानंतर पुन्हा 12 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात सायकल राइड चॅलेंज चे आयोजन करण्यात येणार असून या माध्यमातून उपक्रमांमधून सायकलिंग बाबत आवड निर्माण व्हावी, आणि बारामती शहराला सायकलिंगचे शहर म्हणून ओळख निर्माण व्हावी असा संकल्प असल्याचे बारामती सायकल क्लब चे ऍड श्रीनिवास वाईकर यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!