दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२२ । सातारा । सातारा पालिकेच्या 13 जागांचे ओबीसी आरक्षण सोडत प्रक्रिया गुरुवार दि. 28 रोजी सायंकाळी चार वाजता शाहू कलामंदिर येथे होणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या सोडत प्रक्रियेमध्ये खुल्या गटातील अनेक उमेदवारांचे पत्ते कट होण्याची शक्यता असल्याने या आरक्षण सोडत इकडे संपूर्ण सातारा शहरांचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा पालिकेच्या ओबीसी आरक्षणाशिवाय झालेल्या सोडतीमध्ये 18 प्रभागासाठी आरक्षण आणि सात प्रभागांसाठी अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण या पद्धतीची आरक्षण रचना झाली होती. यामध्ये न्यायालयाचा निर्णय झाला नसल्याने 13 जागांचे आरक्षण खुल्या प्रवर्गात हस्तांतरित झाले होते. मात्र महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर बऱ्याच न्यायालयीन प्रक्रियेनंतर ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 54 जागांची ओबीसी आरक्षण सोडत प्रक्रिया ही येत्या 28 जुलै रोजी गुरुवारी काढण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सातारा मेढा पाचगणी महाबळेश्वर या चार स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षण काढले जाणार आहे. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे आरक्षण सुद्धा गुरुवारी सकाळी 11 वाजता काढले जाणार आहे.
सातारा पालिकेच्या तेरा जागांचे आरक्षण सोडत गुरुवारी सायंकाळी चार वाजता शाहू कलामंदिर येथे घेतली जाणार आहे. साताऱ्याचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढली जाईल. ही सोडत अनुसूचित जाती जमातीचे सात प्रभाग वगळून खुल्या 18 प्रभागात तेरा ओबीसी जागांचे आरक्षण टाकले जाणार आहे. यामध्ये पहिल्यांदा प्रभागांच्या चिठ्ठ्या टाकून कोणत्या प्रभागात ओबीसी आरक्षण पडेल हे सोडतीद्वारे निश्चित होईल. त्यानंतर 50 टक्क्यांच्या महिला आरक्षण याप्रमाणे सात ओबीसी महिला जागांचे आरक्षण सोडत काढली जाईल. उरलेल्या सहा जागा या ओबीसी सर्वसाधारण जागेसाठी असतील म्हणजेच 25 प्रभागांपैकी प्रभाग अनुसूचित जाती जमाती तेरा प्रभाग इतर मागास प्रवर्गासाठी सात व उरलेले पाच प्रभाग हे खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत.
नगरसेवकांच्या संख्यानिहाय जर विचार केला तर तीस नगरसेवक हे खुल्या गटातील तेरा नगरसेवक हे इतर मागास प्रवर्गातील आणि सात नगरसेवक हे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील निवडले जाणार आहेत. या ओबीसी आरक्षण सोडतीमध्ये बऱ्याच खुल्या जागातील उमेदवारांचे पत्ते कापले जाणार असल्याने त्यांच्या पोटात गोळा आला आहे. यामध्ये खुल्या गटात नगर असे माजी नगरसेवक वसंत लेवे अमोल मोहिते शेखर मोरे-पाटील, अविनाश कदम अशी दिग्गज नावे असल्याने आरक्षण सोडतीनंतरच कोणाचा पत्ता सेफ होणार किंवा कोणाचा पत्ता कापला जाणार हे स्पष्ट होणार आहे, त्यामुळे ही सोडत राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून संपूर्ण साताराची लक्ष तिकडे लागून राहिले आहे.