दैनिक स्थैर्य । दि.२२ मार्च २०२२ । मुंबई । प्रबळ एचडी गेमिंग वातावरणासह क्लॅश ऑफ टायटन्स भारताचा पहिला मोबाइल मोबा गेम आहे, जो मोबाइल इंटरफेसच्या डायनॅमिक्समध्ये एपिक युद्धांचा रोमांचक अनुभव देतो. टीम आधारित मोबा फॉर्मेट रणांगणावरील सर्वसमावेशक स्थिती देतो, जेथे खेळाडूंना रिअल-टाइममध्ये एकत्र काम करत त्यांच्या प्रतिस्पर्धींच्या डावपेचांचा सामना करावा लागतो. क्लॅश ऑफ टायटन्स निवडण्यासाठी ५६ अद्वितीय टायटन्सचे रोस्टर देते, जे तुमच्या खेळाच्या शैलीशी जुळते.
क्लॅश ऑफ टायटन्स टीम विनाव्यत्यय गेमिंग अनुभव मिळण्याची गरज ओळखते. त्यांनी गेममध्ये सुरेखरित्या फ्लूइड इंटरऑपरेबिलिटी प्रोग्राम केली आहे, ज्यामधून मोबाइल गेमिंगमधील सर्वात सुलभ इंटरफेसेसचा अनुभव मिळतो. क्लॅश ऑफ टायटन्सचे विश्व खेळाडूंना गेममधील त्यांच्या स्वभावामध्ये बदल करण्याची सुविधा देते. तुम्ही तुमच्या टायटनमध्ये तुमचा वैयक्तिक स्वभाव व व्यक्तिमत्त्वाची भर करू शकता.
क्लॅश ऑफ टायटन्समधील सामने फक्त २० सुपर-चार्ज मिनिटांचे आहेत, ज्यामुळे तुम्ही एक किंवा अधिक फे-या खेळत असाल तर तुम्हाला प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्यासाठी तुमच्याकडे असलेली वेळ माहित असेल. क्लॅश ऑफ टायटन्स मल्टीप्लेअर टीम आधारित युद्धांचा रोमांच देतो, ज्यामधून मोबाच फॉर्मेट दिसून येते. विविध डावपेच व डायनॅमिक गेमप्ले खात्री देतात की प्रत्येक सामना अद्वितीय आहे, जेथे ते त्यांच्या प्रतिस्पर्धींच्या डावपेचांचा रिअल-टाइममध्ये सामना करतात. खरंच, प्रत्येक विजय मिळवावा लागतो.
पहिला भारतीय मोबाइल मोबा क्लॅश ऑफ टायटन्स शैलीमध्ये अग्रणी आहे. टायटन्सचे लक्षवधेक रोस्टर, सर्वसमावेशक गेमप्ले, मिळणारा पाठिंबा आणि नियमित नवीन कन्टेन्टची भर यामुळे गेमर्सना निश्चितच समाधान मिळेल.