सातारा जिल्ह्यात नववर्षात 26 महाविद्यालयात संचारबंदी…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । सातारा । राज्य सेवा पूर्व परीक्षा- 2021 साठी रविवार 2 जानेवारी 2022 रोजी सातारा, कोरेगाव, कराड या तालुक्यातील 26 विद्यालय, महाविद्यालयांमध्ये होणार आहे. दि. 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8 ते सायं. 6 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील उपरोक्त नमुद केलेल्या उपकेंद्राच्या परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मिटर परिसरात अप्पर जिल्हादंडाधिकारी सुनिल थोरवे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 प्रमाणे आदेश लागू केले आहेत.

जिल्ह्यातील परीक्षा होणारे केंद्रे पुढीलप्रमाणे अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, शाहूनगर शेंद्रे, अनंत इंग्लिश स्कूल, सातारा, अण्णासाहेब कल्याणी हायस्कूल, सातारा, अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पानमळेवाडी ता. जि. सातारा, छत्रपती शाहू ॲकॅडमी ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, सातारा, धनंजयराव गाडगीळ कॉमर्स कॉलेज, सातारा, कन्या शाळा, सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेकनिक, पानमळेवाडी ता. जि. सातारा, लालबहादूर शास्त्री कॉलेज, सातारा, महाराजा सयाजीराव विद्यालय ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, सातारा, न्यु इंग्लिश स्कूल अ, सातारा न्यु इंग्लिश स्कूल ब, सातारा, पोतदार इंटरनॅशन स्कूल, सातारा, यशोदा टेकनिल कॅम्पस वाढे फाटा, सातारा, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अ, सातारा, डी.पी. भोसले कॉलेज, कोरेगाव, सरस्वती विद्यालय कोरेगाव, दि मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कोरेगाव, शासकीय तंत्रनिकेत विद्यानगर, कराड, सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड, सदगुरु गाडगे महाराज कॉलेज ब, कराड, सेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड, एस.एम.एस इंग्लिश मिडीयम स्कूल कराड, टिळक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कराड , यशवंतराव हायस्कूल कराड, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा या 26 केंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षा केंद्रांवर नेमलेले अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयाच्या परिसरातील सार्वजनिक टेलिफोन, एस.टी.डी.बुथ, आयएसडी बुथ, फॅक्स केंद्रावर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॅझीस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप परीक्षा केंद्राच्या 100 मिटर पर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेहण्यास मनाई करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!