स्थैर्य, फलटण, दि. 22 : कमिन्स इंडिया फॉऊंडेशनतर्फे फलटण शहरातील प्रमुख ठिकाणी उदा. फलटण बसस्थानक, जिंती नाका, स्वामी समर्थ मंदिर, जबरेश्वर मंदिर, माळजाई मंदिर, बादशाह मस्जिद, पंढरपूर रोड, पाचबत्ती चौक, दगडी पूल इ ठिकाणे. मास्कचे वाटप करून नागरिकांना मास्क लावणे, स्वच्छ मास्कचा वापर, साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे याविषयीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. मास्क लावला असताना त्याला सतत स्पर्श करू नये , केल्यास त्वरित आपले हात साबण व पाणी वापरून स्वच्छ धुवा. बाहेरून आले नंतर हात साबण किंवा हँडवॉशने कमीत कमी २० सेकंद धुणे आवश्यक आहे याविषयीची माहिती प्रात्यक्षिकांद्वारे दाखविण्यात आली. सदर प्रात्यक्षिकांमध्ये एस टी डेपोतील कर्मचारी, पोलीस, शहरातील वयोवृद्ध मंडळी सहभागी झाले.