
दैनिक स्थैर्य | दि. ०५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
निंबळक, ता. फलटण येथील राज्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रामसाहेब निंबाळकर यांचे काका बाबासाहेब नानासाहेब निंबाळकर यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी अल्पशा आजाराने २९ जानेवारी रोजी निधन झाले.
बाबासाहेब निंबाळकर हे ‘बाबाकाका’ म्हणून परिसरात परिचित होते. सुसंस्कृत, अभ्यासू, लोकहितवादी, समाजप्रबोधक, शेतकर्यांबाबत अतिसंवेदनशील अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने सर्व निंबाळकर परिवारावर शोककळा पसरली आहे. बाबाकाकांच्या अंत्यविधीस राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
बाबासाहेब निंबाळकर हे हनुमंतराव निंबाळकर, मुरलीधर निंबाळकर यांचे वडील, तर राज्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रामसाहेब उदयसिंह निंबाळकर, लेनदेव दादासोा निंबाळकर यांचे काका होत.
बाबासाहेब निंबाळकर यांचा दशक्रिया विधी मंगळवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता, तर उत्तरकार्य (तेरावा विधी) शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी निंबळक येथे होईल.