योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांना ‘सांस्कृतिक योद्धा’ पुरस्कार २०२३

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२३ । नोएडा । हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथजी आणि माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजनजी यांच्या हस्ते ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार 2023’ प्रदान करण्यात आला. ‘स्मृती चिन्ह’ आणि एक लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्कारचे स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ‘सेव कल्चर सेव इंडिया’ फाऊंडेशनच्या वतीने उत्तर प्रदेश राज्यातील ‘ग्रेटर नोएडा’ येथील गौतमबुद्ध विद्यापिठात संपन्न झाला. या वेळी व्यासपिठावर ‘सेव कल्चर सेव इंडिया’ फाऊंडेशनचे संस्थापक तथा भारताचे माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर हे उपस्थित होते.
         राष्ट्र आणि भारतीय संस्कृती यांवर कुदृष्टी ठेवणार्‍यांच्या विरोधात सातत्याने संवैधानिक मार्गाने संघर्ष करणे, चित्रकार एम्.एफ्. हुसेन आणि डॉ. झाकीर नाईक यांचे राष्ट्र तथा समाज विरोधी स्वरूप लोकांसमोर आणणे, तसेच भारतीय संस्कृतीच्या रक्षणार्थ पुस्तकांचे लेखन करणे यांसाठी हा पुरस्कार श्री. रमेश शिंदे यांना देण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.
या वेळी विकृत साहित्य निर्मिती करून देशातील युवापिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍यांना उघडे पाडण्यासाठी ‘कृपया ध्यान दे’ या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री योगीजी म्हणाले की, भारतियांनी अनेक वर्षे ब्रिटिश आणि मुघल यांच्याकडून अत्याचार सहन केले; पण ज्या वेळी त्यांनी भारतीय संस्कृती आणि मंदिरे यांवर आघात करण्यास प्रारंभ केल्यावर भारतियांनी चोख प्रत्यूत्तर देण्यास प्रारंभ केला. भारतियांनी कधीही संस्कृतीवरील आक्रमणे सहन केली नाहीत. सध्या डिजिटल माध्यमातून संस्कृतीवर हल्ले होत आहेत. नुकतेच ‘गेमिंग ॲप’च्या माध्यमातून धर्मांतर केले जात असल्याचे प्रकरण उत्तर प्रदेश पोलिसांनी उघडकीस आणले आहे. दिल्लीतील घटना सर्वांनी पाहिली आहे, कशा प्रकारे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्यांचा खून करण्यात आला. या संदर्भात आम्ही सर्वप्रथम कायदा केला; पण प्राथमिक स्तरावर प्रत्येक कुटुंबामध्ये खूप जागरुकता निर्माण होण्याची खूप आवश्यकता आहे.
या वेळी संस्कृती रक्षणासाठी लढा म्हणून हिंदु फ्रंट फॉर जस्टीसचे प्रवक्ते तथा सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनाही हा पुरस्कार देण्यात आला. यांसह चित्रपट निर्माते प्रवीण चतुर्वेदी, पत्रकार स्वाती गोयल शर्मा, पत्रकार प्रदीप भंडारी, वैशाली शाह, संजीव नेवर आणि मनीष बर्दिया यांनाही ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार 2023’ने सन्मानित करण्यात आले.
आपला नम्र,
श्री. सुनील घनवट,
संघटक, हिंदु जनजागृती समिती,
संपर्क : 7020383264

Back to top button
Don`t copy text!