
दैनिक स्थैर्य | दि. २६ डिसेंबर २०२३ | बारामती |
बारामती एमआयडीसीमधील भारत फोर्ज कंपनीमध्ये सांस्कृतिक महोत्सवज्ञ (फॅमिली डे) चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये वेशभूषा, नृत्य, गीत, गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचे उद्घाटन भारत फोर्जचे कार्यकारी संचालक सुबोध तांदळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ अधिकारी संजय अग्रवाल व एचआर मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट सदाशिव पाटील व भारत फोर्ज कामगार संघटना (कॅम) चे बारामती अध्यक्ष रणजित भोसले, अभिजित काटे – उपाध्यक्ष, किरण खोमणे – सचिव, नंदकुमार राखुडे – खजिनदार व सदस्य संदीप मोरे, नंदकिशोर शिंगणे, अतुल अभंग, राहुल बाबर, संतोष जाधव व संघटनेचे सर्व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कलागुणांना वाव भेटावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून अशा कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असल्याचे कार्यकारी संचालक सुबोध तांदळे यांनी सांगितले.
सांस्कृतिक महोत्सव हा भारत फोर्ज परिवाराचा अविभाज्य घटक असून त्या माध्यमातून कर्मचारी व कुटूंबीय एका धाग्यात विणले जात असल्याचे एचआरचे व्हाईस प्रेसिडेंट सदाशिव पाटील यांनी सांगितले.
विविध गटातील विजेत्यांना परीक्षक व अधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
स्वागत महेश जाधव यांनी केले. आभार भारत फोर्ज सांस्कृतिक महोत्सव कमिटीच्या वतीने मानण्यात आले.