दैनिक स्थैर्य । दि. ०५ नोव्हेंबर २०२२ । सातारा । वाढे फाटा तालुका सातारा येथे भंगाराच्या दुकान परिसरात गांजाची लागवड करणाऱ्या एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखेने आज अटक केली परशुराम रामफेर ठाकूर वय 35 राहणार रघुनाथ पुरा करंजे या संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे . या कारवाईत पाच लाख बावीस हजार रुपये किंमतीची वीस किलो वजनाची गांजाची चार झाडे जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी या संदर्भात दिलेली माहिती अशी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळालेल्या बातमीनुसार वाढे फाटा सातारा येथे एका भंगाराच्या दुकान परिसरात एका इसमाने गांजाच्या झाडांची लागवड करून जोपासना केली आहे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी दुपारी वाढे फाटा येथील दुर्गामाता स्क्रॅप मर्चंट या दुकानात छापा टाकला.
दुकानाच्या परिसरात गांजाची लागवड करण्यात आल्याचे त्यांना आढळून आले या गांजाची एकूण किंमत पाच लाख बावीस हजार रुपये आहे गांजाचे वजन वीस किलो असून चार झाडे जप्त करण्यात आली आहेत सातारा शहर पोलीस ठाण्यात 2022 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार या कलमाअंतर्गत संबधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील आतिश घाडगे संतोष सपकाळ संजय शिर्के विजय कांबळे प्रवीण फडतरे शरद बेबले लक्ष्मण जगधने प्रवीण फडतरे मुनीर मुल्ला निलेश काटकर विक्रम पिसाळ गणेश कापरे विशाल पवार पृथ्वीराज जाधव रोहित निकम वैभव सावंत धीरज महाडिक संभाजी साळुंखे, फॉरेन्सिक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार जाधव व अमोल जाधव यांनी सहभाग घेतला होत.