e-KYC पूर्ण करण्यासाठी सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र शनिवार व रविवार राहणार सुरु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । सातारा । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( PM KISAN) योजनेंतर्गत e-KYC पूर्ण करण्यासाठी सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीत सुरु राहणार आहे,  असे   जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( PM KISAN) योजनेंतर्गत e-KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेले आहे. प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना शासनस्तरावरुन देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीत सुरु राहणार असून याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.


Back to top button
Don`t copy text!