स्थैर्य, मुंबई, २७ : मागणी कमी असतानाही लिबियातील तेल उत्पादनात वाढ झाल्याने कच्च्या तेलाचे दर घसरले. डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ३.२% नी घसरले व ते ३८.६ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की लिबियातील सर्वात मोठे तेलक्षेत्र असलेल्या शरारा येथील क्रूड उत्पादन वाढल्याने तसेच जागतिक मागणीत घट झाल्याने तेलाचे दर आणखी खाली आले. लिबियातील नॅशनल ऑइल कॉर्पोरेशनने सक्तीचे निर्बंध उठवल्याने जागतिक तेल बाजारात अतिरिक्त पुरवठा होण्याच्या चिंता वाढल्या.
युरोप आणि उत्तर अमेरिकेत वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा लॉकडाऊन लादण्यात आले. परिणामी आधीच विस्कळीत झालेल्या जागतिक तेल बाजारात आणखी अडथळे निर्माण झाले. परिणामी तेलाचे दर आणखी घसरले. नव्या लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे तेलाच्या मागणीवर आणखी दबाव आले आहेत. कोव्हिड-१९ रुग्णांमध्ये आणखी वाढ तसेच लिबियातील वाढीव उत्पादन यामुळे कच्च्या तेलाचे दर आणखी घसरले. आजच्या सत्रात तेलाचे दर कमी किंमतीवर व्यापार करतील असा अंदाज आहे.