घरावर दगडफेक करत जमावाची महिलांना मारहाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 02 : केळवली (ता.सातारा) येथे खासगी क्षेत्रातून रस्त्याचे रंदीकरणाच्या कामास हरकत केल्याचा राग मनात धरुन चौघांनी एका महिलेसह तिच्या पुतणीस लाथाबुक्क्यांनी तसेच दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातीलच 14 लोकांसह इतर गावातील 10 ते 15 लोकांनी महिलेच्या घरावर दगडफेक करत संसारोपयोगी साहित्याची मोडतोड करुन 70 हजार रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंकिता विनोद केरेकर (वय 26) ही महिला आपल्या पती व दोन मुलांसह विरार ईस्ट मुंबई येथे राहत आहे. दोन महिन्यापुर्वी लॉकडाऊन होण्याचे आधीही महिला आपल्या कुटुंबीयांसमवेत मुळगावी  केळवली येथे राहण्यास आली आहे. महिलेचे सासरे दिनकर केरेकर यांचे नावे खेतवाडी, मुंबई येथे राहत असल्याने त्यावरुन वेळोवेळी कुटुंबाचे व गावातील लोकांच्यात वादविवाद आहेत. त्यामुळे गावातील लोक त्यांच्या कुटुंबाला गावामध्ये कपडे धुण्यासाठी गेल्यावर विनाकारण हेतु पुरस्पर त्रास देत असतात.         

दि. 30 रोजी दुपारी 3 वाजण्याचे सुमारास गावातील खासगी जागेतून दत्तवाडी या गावाकडे जाण्याकरीता पाऊल वाट असून त्याचे सध्या रंदीकरणाचे काम चालु आहे. त्यामध्ये क्षेत्र जास्त जात असल्याने गावातील लोकांना त्याबाबत हरकत घेतली होती. त्यावरुन कुटुंबातीलच सचिन श्रीरंग केरेकर, निलेश बजरंग केरेकर, सुरेंद्र आत्माराम केरेकर व देवेंद्र आत्माराम केरेकर यांच्यात वादविवाद झाला. त्यांनी अंकिता केरेकर व त्यांची पुतणी ऋतिका विजय केरेकर या दोघींना लाथाबुक्यांनी तसेच लाकडी दांडक्याने ही मारहाण केली. त्यामध्ये दोघींच्या पायाला  गंभीर मार लागला आहे. तसेच भांडणादरम्यान सोन्याचे मंगळसूत्र व कानातले सोन्याचे रिंगा पडून गहाळ झाले आहेत.   त्यानंतर दि. 31 रोजी सायंकाळी 6 वाजण्याचे सुमारास फिर्यादी अंकिता केरेकर व सासु सुंगधा दिनकर केरेकर, जाऊ चित्रलेखा योगेश केरेकर, मावस सासु जयवंताबाई दत्ताराम केरेकर, पुतणी ऋतिका विजय केरेकर, व घरातील लहान मुले घरी बसले होते. यावेळी घरासमोरील राहण्यास असणारे सचिन श्रीरंग केरेकर, निलेश बजरंग केरेकर, सुरेद्र आत्माराम केरेकर व देवेंद्र आत्माराम केरेकर यांनी शिविगाळ करीत हे कुटुंब गावात कसे राहते हेच बगतो, असे बोलुन घरावर दगडफेक केली. तसेच त्यांच्यासोबत गावातील सदानंद श्रीरंग केरकर, जितेंद्र रामचंद्र केरेकर, मयुर आत्माराम केरेकर, सुधीर रघुनाथ केरेकर, लक्ष्मी रामचंद्र केरेकर, शितल जितेंद्र केरेकर, सुवर्णा सदानंद केरेकर, निर्मला आत्माराम केरेकर, सुरेखा लक्ष्मण केरेकर, पुष्पा बजरंग केरेकर व इतर गावातील 10 ते 15 लोकांनी अंकिता केरेकर यांच्या घराचे दरवाजे, तोडून घरात प्रवेश केला. घरातील संसारउपयोगी साहित्यांची तोडफोड करुन घरावरील कौले दगड मारुन फोडून नुकसान केले. तुम्हाला मस्ती आली असून तुम्ही गावात कसे राहता तेच बघतो असे बोलून दमदाटी केली व आम्हाला जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती समजताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी हजर झाले. याप्रकरणी अंकिता केरेकर यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून 14 लोकांसह जमावार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!