
स्थैर्य, दि.१८: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भल्या पहाटे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची बारामतीत पाहणी केली. त्यानंतर इंदापूर आणि सोलापूरला ते रवाना झाले. यावेळी उजनी धरण क्षेत्राची पाहणीही त्यांनी केली आहे.
यावेळी
अजित पवारांनी पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे
तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेती पिकांच्या
नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
भिगवण
रस्त्यावरील अमरदिप हॉटेल, तांदुळवाडी भागातील वृध्दाश्रम, पंपहाऊस येथील
चांदगुडे वस्ती, कऱ्हा नदीवरील खंडोबा नगर येथील पूल, कऱ्हावागज-अंजनगाव
पूल आणि बंधारा, बारामती-फलटण रोडवरील पाहुणेवाडी, गुणवडी आणि इंदापूर
ओढ्यावरील पुलाच्या परिसराची पाहणी केली.
हवामान
खात्याच्या अंदाजानुसार 2 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात
घेऊन प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
पुढील
काळात पुरस्थिती टाळण्यासाठी नदीचे खोलीकरण करणे नदीच्या आणि ओढ्याच्या
काठावरील अतिक्रमण हटवणे तसेच नदीच्या आणि ओढ्याच्या काठी पूररेषेच्या आत
अतिक्रमणं होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना
दिल्या.
कऱ्हावागज-अंजणगाव
येथील बंधाऱ्याजवळील पुलाचा भराव खचला आहे. तसंच बारामती-फलटण रस्त्यावरील
पाहुणेवाडी येथील रस्त्याचा भराव खचला असून या दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प
झाली आहे. या ठिकाणची दुरुस्तीची कामे तातडीने करून वाहतूक सुरळीत
करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.