सेंट्रींग प्लेटा चोरणारा जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०६ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा येथील बुधवार नाक्यावरुन सेट्रींग प्लेटा चोरी करणाऱ्या एकाला शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले. निलेश रामदास भिसे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असन त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, निलेश भिसे याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, दि. ३१ डिसेंबर रोजी बुधवार नाका परिसरातून सहा हजार रुपये किमंतीच्या दहा संेट्रींग प्लेटा चोरीला गेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा करत असताना प्लेटा चोरुन नेणाऱ्यची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव निलेश रामदास भिसे (रा. बुधवार नाका, सातारा) असे सांगितले. त्याने यावेळी बुधवार नाक्यावरुन लोखंडी प्लेटा चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली असून तो आता पोलीस कोठडीत आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!