
दैनिक स्थैर्य । 9 मार्च 2025। पुणे । खोट्या इतिहासातून मराठ्यांची प्रतिमा मलिन करणार्यांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचा इशारा श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. महाराणी येसुबाईंचे माहेरकडील श्रीमंत राजेशिर्के घराण्याच्या वंशजांनी श्रीमंत रघुनाथराजेंची भेट घेतली. यावेळी वादग्रस्त छावा चित्रपटासह राजेशिर्के व अन्य मराठा घराण्याच्या इतिहासात होत असलेल्या खोडसाळपणावर चर्चा केली.
यावेळी शिव-शंभुकालीन इतिहासाच्या विकृतीकरणास जबाबदार असणारे मंडळी तसेच मराठ्यांची प्रतिमा मलिन करणारे, मुद्दाम खोटा इतिहास पसरविणार्या, लिहिणार्या सर्व कादंबरीकार, पुस्तक लेखक, मालिका निर्माते, चित्रपट निर्माते दिग्दर्शक, नाटककार, महानाट्य निर्माते यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निश्चित झाले.
यावेळी दिपक राजेशिर्के, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, सचिन राजेशिर्के, भूषण राजेशिर्के, लक्ष्मीकांत राजेशिर्के, भारत राजेशिर्के, नवनाथ राजेशिर्के, चेतन राजे शिर्के, अमोल पवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत होते.