
स्थैर्य, सातारा, दि.११: लॉकडाऊनची मुदत वाढवलेली असतानाही विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवून गुन्हे दाखल केले.
याबाबत माहिती अशी, लॉकडाऊनची मुदत दि 15 मे पर्यंत वाढवण्यात येत आहे. व सी आर पी सी का क .144 सातारा जिल्हयात लागु केले आहे. दिनांक -10 रोजी शाहुपुरी पोलीस पेट्रोलिंग करत असताना सकाळी 08.00 ते 10.00 वा चे सुमारास जुना RTO चौक ते करंजे नाका सातारा येथे काही नागरिक विनाकारण फिरत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी सईद आली हसेन बागवान वय 34 वर्षे , रा. शाहपूरी सातारा 2 ) मनिषा सुभाष कोकाडे वय 20 वर्षे, रा. हेरबं प्राईट कंरजे सातारा 3) प्रमोद दिलीप पन्हाळे वय 30 वर्षे रा आकाशवाणी झोपडपट्टी सातारा यांच्यावर संचारबंदी केली असतानाही कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.