
दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा तहसीलदार आशा होळकर यांनी दिलेल्या तडीपारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत सर्जेराव किर्तीकुडाव (रा. बौद्धवस्ती, कोडोली, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. याबाबतची तक्रार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विनायक मनवी यांनी दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार गायकवाड करत आहे.