दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । सातारा । महिलेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन २०१९ ते दि. १० नोव्हेंबर २०२२ दरम्यान मुंबई सेंट्रल व विकास नगर, खेड, ता. सातारा येथे सौ स्नेहांकित निखिल सोनवणे, वय ३१ या महिलेला पती निखिल मिलिंद सोनवणे, सासू संगीता मिलिंद सोनवणे, सासरे मिलिंद बाजीराव सोनवणे, दीर अनिकेत मिलिंद सोनवणे, नणंद प्रियांका मिलिंद सोनवणे सर्व राहणार मुंबई सेंट्रल यांनी वारंवार मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करून तिच्या मुलाचे दागिने काढून घेऊन तिचा जाचहाट केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.