साताऱ्यात पाच व्यावसायिकांवर गुन्हे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२५: घरपोच सेवेची परवानगी असताना देखील दुकाने, हॉटेल, दारु दुकान सुरु ठेवून आदेश उल्लंघन करणाऱ्या पाच व्यावसायिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सातारा शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे व बोरगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, कोरोना वाढत्या संसर्गाने लॉकडाऊन कडक करण्यात आल्याने रस्त्यावर वर्दळ मंदावल्याचे दिसून आले. जे विनाकारण बाहेर पडत होते त्यांच्यावर कारवाई सत्र पोलिसांनी सुरुच ठेवली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरपोच सेवेसाठी परवानगी असताना देवा ऑइल डेपो हे दुकान सुरु ठेवत आदेश उल्लंघन करणाऱ्या देवदत्त रघुनाथ राजमाने (रा. रविवार पेठ, सातारा) तसेच प्रतापगंज पेठेतील महाडवाले ब्रदर्स ही आस्थापना सुरु ठेवल्याप्रकरणी मनिष शरद महाडवाले (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या विरुध्द कॉन्स्टेबल सचिन नवघणे यांनी तक्रार दिली आहे.

देशमुखनगर येथे देशी दारु दुकान सुरु ठेवणाऱया श्रीकांत लालासाहेब देशमुख (रा. नांदगाव, ता. सातारा) याच्यावर बोरगाव पोलिसांनी कारवाई केली. त्याच्यावर आदेश उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला असून त्याच्या विरुध्द कॉन्स्टेबल अमित पवार यांनी तक्रार दिली आहे.

वाढे येथे राष्ट्रीय महामार्गावर पुलाखाली गाडीवर फिरते हॉटेल सुरु ठेवून आदेश उल्लंघन करणाऱया सुनील पांडुरंग जाधव (रा. वाढे, ता. सातारा) तसेच हॉटेल रस्सासमोर विनाकारण गाडी फिरवणाऱया विनोद बबन भोसले (वय ३८, रा. वाढे कॅनालजवळ, वाढे, ता. सातारा) यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या विरुध्द पोलीस नाईक दीपक पोळ यांनी तक्रार दिली आहे. हवालदार तोरडमल अधिक तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!