
दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । सातारा । महिलेचा विनयभंग केलाप्रकरणी तक्रार दिल्यानंतर एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस स्टेशनमधून दिलेली माहिती अशी, रविवार, दि. १९ जून रोजी जरंडेश्वर नाका येथील शेतामध्ये अशोक वसंत भोजने वय ४७ रा. करंजे पेठ, सातारा यांनी एका महिलेला हे शेत माझे आहे, असे म्हणत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिला मारहाण केली.