दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । सातारा । एका महिलेचा विनयभंग करुन धमकी दिली. याप्रकरणी किरण सदाशिव मोरे वय २८, रा. चिंचणी पुनर्वसन, अंगापूर ता.सातारा याच्याविरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ५ व ८ रोजी सातारा तालुक्यातील एका गावात घडली आहे. सदरचा संशयित हा वारंवार महिलेचा पाठलग करत असून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने चिडून जावून धमकी दिल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.