
दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२१ । सातारा । कोरेगाव तालुक्यातील एका गावातील महिलेचा सातारा तालुक्यातील मालगाव येथे विनयभंग केल्याप्रकणी अजित विजयसिंह कदम याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिला कामानिमित्त मालगाव येेथे आली होती. याचवेळी अजित कदम हा दारुच्या नशेत रस्त्याने जात असताना संबंधित महिला त्याला खाली बघून जा. लहान मुलांची खेळणी विस्कटू नका, असे म्हटली. याचा राग आल्याने चिडलेल्या अजितने महिलेस मारहाण करत मनास लज्जा होईल, असे वर्तन केले. याबाबतची तक्रार महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात केल्यानंतर अजित कदम याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार कुमठेकर हे करत आहेत.