
स्थैर्य, सातारा, दि. 6 : अंगापूर वंदन येथे पायी चालत निघालेल्या तिघांना भरधाव मोटरसायकलने ठोकर देवून जखमी केले. याप्रकरणी संबंधित मोटारसायकल स्वार शाहरूख बशीर शेख, रा. अंगापूर वंदन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, दि. 1 फेब्रुवारी रोजी दत्तू साहेबा वाघमारे वय 42 रा. अंगापूर, ता. सातारा (मुळ रा. बीड) तसेच अलका साबळे, अजिनाथ साबळे हे अंगापूर तर्फमधून अंगापूर वंदनकडे पायी निघाले होते. यावेळी पाठीमागून शाहरूख बशीर शेख हा दुचाकीवरून भरधाव वेगाने आला. या दुचाकीची पायी निघालेल्या वाघमारे, अलका साबळे व अजिनाथ साबळे यांना जोरदार धडक बसली. यात तिघेही जखमी झाले. याप्रकरणी दत्तू वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.