अपघातप्रकरणी मृत दुचाकीस्वारावर गुन्हा


 

स्थैर्य, सातारा, दि.१: जैतापूर, ता. सातारा गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी हलगर्जीपणे वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत माहिती अशी, जैतापूर येथे सातारा रहिमतपूर मार्गावर रोहन सुरेश सपकाळ (वय १८, रा. गोजेगाव ता. सातारा)  हा गोजेगावच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. त्याच्याजवळ ड्रायव्हिंगचे लायसन नव्हते व निष्काळजीपणे तो दुचाकी चालवत होता. त्याचा दुचाकीवरील ताबा सुटून गाडी मातीच्या ढिगार्‍याला धडकून खड्ड्यात पडली. या अपघातात गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून हलगर्जीपणे गाडी चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रोहन सपकाळ याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!